कोल्हापूर : निम्म्या शहरात सोमवारी पुन्हा पाणीपुरवठा बंद | पुढारी

कोल्हापूर : निम्म्या शहरात सोमवारी पुन्हा पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : निम्म्या कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा सोमवारी (दि. 15) पुन्हा बंद राहणार आहे. पुईखडी जल शुद्धीकरण केंद्राकडून जाणार्‍या जलवाहिनीला आयटीआय वसतिगृहाजवळ क्रॉस कनेक्शनचे काम सोमवारी केले जाणार आहे. त्यामुळे पुईखडी जल शुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. परिणामी शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठेसह ए, बी वॉर्ड आणि संलग्न भागात पाणीपुरवठा होणार नाही. तसेच मंगळवारी (दि. 16) अपुरा व कमी दाबाने पुरवठा होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी क्रॉस कनेक्शनचे काम केले होते. परंतु वेल्डिंगमधून गळती लागल्याने पुन्हा दुरुस्ती केली जात आहे.

शहरातील ए, बी वॉर्डमधील पुईखडी जल शुद्धीकरण केंद्रावरून येणार्‍या कळंबा जेलसमोरील परिसर, वसंत विश्वास पार्क, एलआयसी कॉलनी, अमरनाथ मंदिर परिसर, बाबूराव साळोखे पार्क, तपोवन, म्हाडा कॉलनी, सोमराज कॉम्प्लेक्स, नाळे कॉलनी, बापूरामनगर, प्रथमेशनगर, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, बुद्धिहाळकर नगर, वाल्मिकी आंबेडकर नगर, शांती उद्यान, शिवगंगा कॉलनी, श्रीराम कॉलनी, साई कॉलनी, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, राजलक्ष्मी नगर, देवकर पाणंद, एन. टी. सरनाईक नगर, योगेश्वरी कॉलनी, रायगड कॉलनी, चव्हाण कॉलनी, मोहिते कॉलनी, गणपती नगर, पार्वती पार्क, भोसले कॉम्प्लेक्स, मल्हार रेसिडेन्सी, शिवप्रभूनगर, मोरे माने नगर, राणे कॉलनी, आक्काताई मानेनगर, महादेव नगरी, जनाई दत्तनगर, विद्या विहार कॉलनी, जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर स्टँड, नवीन मोरे कॉलनी, जोशीनगर, विजयनगर, शहाजी वसाहत, संभाजीनगर, शाहू मिल, गंजीमाळ, रामानंदनगर, जरगनगर, रेणुकानगर, आर. के. नगर, गणेश कॉलनी, हनुमान नगर, ज्योतिर्लिंग कॉलनी, रायगड कॉलनी, हॉकी स्टेडियम परिसर, बालाजी पार्क, यशवंत कमल पार्क, जाधवनगर, खंडोबा मंदिर, भारत नगर, सुभाषनगर, वाय. पी. पोवारनगर, मंगळवार पेठ, वारे वसाहत, शाहू बँक परिसर, राम गल्ली, भारत डेअरी परिसर, मंगेशकर नगर, बेलबाग, मंडलिक वसाहत, पाटाकडील तालीम, बजापराव तालीम, जासूद गल्ली, कोळेकर तिकटी, पोवार गल्ली, शिवाजी पेठ, वेताळ माळ तालीम, 8 नंबर शाळा, फिरंगाई गल्ली, टिंबर मार्केट परिसर, कोंडेकर गल्ली, सरदार तालीम, शहाजी वसाहत, साळोखेनगर टाकी अंतर्गत कणेरकरनगर, आपटेनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, बीडी कॉलनी, बोंद्रेनगर, राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी नगर, हिंदू कॉलनी, सुलोचना पार्क, राधानगरी रोड, क्रशर चौक, मोहिते पार्क, केदार पार्क, देशमुख शाळा परिसर, शिवाली पार्क आदी भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे.

Back to top button