कोल्हापूर : वारणा कापशी येथे दिवसा ९ बकऱ्यांची चोरी | पुढारी

कोल्हापूर : वारणा कापशी येथे दिवसा ९ बकऱ्यांची चोरी

बांबवडे पुढारी वॄत्तसेवा : वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथे गुंगा चंद्राप्पा शेळके यांच्या मालकीच्या शेडमधून ९ बकऱ्यांची चोरी झाली.  हा प्रकार आज (दि.९) दुपारी २ ते ३ या वेळेत झाला असून चोरीच्या ठिकाणी एक चाकू सापडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुंगा शेळके यांच्या मालकीचे वारणा कापशी – मलकापूर रोडवर जनावरांचे शेड आहे. त्यामध्ये त्यांनी गाई- म्हैशीबरोबर बकऱ्यांही पाळल्या आहेत. आज दुपारी दीड वाजता शेळके हे जनावरे व बकऱ्यांना चारापाणी देऊन घरी आले होते. दरम्यान, ३.३० च्या सुमारास गुंगा शेळके यांचा मुलगा शेडमध्ये गेला असता चोरीचा प्रकार त्याच्या लक्षात आला. आज शेडजवळील डोंगरावर असणाऱ्या महादेव मंदिरात महाप्रसाद होता. त्यामुळे लोकांची तसेच वाहनांची ये-जा होती. त्यातून दिवसा चोरीचा प्रकार झाला आहे. बकऱ्यांच्या दोऱ्या कापून वाहनातून मोठी ९ बकरी लंपास केली आहेत. या घटनेची शाहूवाडी पोलिसांत नोंद झाली आहे.

हेही वाचा 

Back to top button