

मराठवाडा विकास आंदोलनात मराठवाड्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, अशी एक मागणी पुढे आली होती. त्यात बाबूराव हे अग्रणी होते. त्यासाठी सुभेदारी विश्रामगृहात त्यांनी व काँग्रेस नेते बाळासाहेब पवार यांनी पत्रपरिषद घेत तेव्हांचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना हटविण्याची मागणी केली, असे जुने पत्रकार सांगतात. या मागणीची दखल घेत काँग्रेस पक्षाने नाईक यांच्याऐवजी मराठवाड्याचे नेते शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री केले. चव्हाण, वसंतदादा पाटील, बॅ. अंतुले, बाबासाहेब भोसले मंत्रिमंडळात बाबूरावांनी विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. 17 ऑक्टोबर, 1985 (वय 60) त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईत एका हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. पण तेथेच तीन दिवसांनी त्यांचे निधन झाले.
यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांत भविष्य अजमावून पाहणारे अण्णासाहेब गव्हाणे यांना परभणीत काँग्रेसउमेदवार शिवाजीराव देशमुख यांच्याकडून 57 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. या वेळी परभणीतून संघटनात्मक काँग्रेसकडून नारायण निकुंभ उभे होते. पण त्यांना 12 हजार मते मिळाली. गव्हाणे व अन्य मंडळी पूर्वी काँग्रेस पक्षातच होती. पण धोरणे न पटल्याने तया पक्षाशी फारकत घेत त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. या पक्षाचा परभणी व धाराशिव जिल्ह्यात चांगला दबदबा होता. पण अण्णासाहेबांना लोकसभेसाठी पराभूत व्हावे लागले, ते आमदार राहिले हा भाग वेगळा. तसे म्हटले तर 1948 ते 1956 हा काळ शेकापचा सुवर्णकाळ होता.या पक्षाचे 28 आमदार विधानसभेत निवडून गेले होते. 56 ला शेकाप फुटल्यानंतर काही जिल्ह्यांपुरताच शेकाप मर्यादित राहिला. तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्र ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी जुन्या सहकार्यांना काँग्रेसमध्ये परतण्याचे आवाहन केले होते. त्यास अनुसरून अनेक नेते काँग्रेस पक्षात परत गेले होते.
(संग्रहित : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दादा गोरे आणि बंकट पाटील यांच्या पहिल्या कथासंग्रहाचे प्रकाशन 14 फेब्रुवारी1976 साली तत्कालिन मंत्री बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि दत्ता सराफ, आनंद यादव यांच्या हस्ते पार पडला.)
हेही वाचा