कवठेकर, कोळेकर, घोळवे, ओमासेंसह 9 पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या | पुढारी

कवठेकर, कोळेकर, घोळवे, ओमासेंसह 9 पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत 28 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष पोलिस निरीक्षक सुनील फुलारी यांनी सोमवारी रात्री उशिरा बदल्याचे आदेश जारी केले. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 9 पोलिस ठाण्यांतील प्रभारी अधिकार्‍यांचा समावेश आहे. अन्य जिल्ह्यांतील 7 पोलिस निरीक्षकांच्या कोल्हापूर जिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत.

बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे, कंसात बदलीचे ठिकाण : संदीप कोळेकर- कोल्हापूर ( सांगली), राजेंद्र सावंत्रे- कोल्हापूर (सातारा), अविनाश कवठेकर- कोल्हापूर (सातारा), भैरू तळेकर- कोल्हापूर (सांगली), राजेंद्र म्हस्के- कोल्हापूर (सातारा), प्रकाश गायकवाड- कोल्हापूर (सांगली), ईश्वर ओमासे- कोल्हापूर ( सांगली), अरविंद काळे- कोल्हापूर ( सातारा), संतोष घोळवे- कोल्हापूर (पुणे ग्रामीण), शिवाजी गायकवाड- सांगली (कोल्हापूर), नारायण देशमुख- सांगली (पुणे ग्रामीण), जितेंद्र शहाणे- सांगली (सातारा), संदीप भागवत- सातारा (सांगली), नवनाथ मदने- सातारा ( पुणे ग्रामीण), निगाप्पा चौखंडे- सातारा (कोल्हापूर), महेश इंगळे- सातारा (कोल्हापूर), विलास भोसले- पुणे ग्रामीण (कोल्हापूर), यशवंत नलावडे- पुणे ग्रामीण (सातारा), संजय जगताप- पुणे ग्रामीण (सोलापूर ग्रामीण), सचिन पाटील- पुणे ग्रामीण (कोल्हापूर), महेश ढवाण- पुणे ग्रामीण (सांगली), नारायण पवार- पुणे ग्रामीण (सोलापूर ग्रामीण), दिलीप पवार- पुणे ग्रामीण (कोल्हापूर), विनय बहिर- सोलापूर ग्रामीण (सांगली), दिपरतन गायकवाड- सोलापूर ग्रामीण (पुणे ग्रामीण), गोरख गायकवाड- सोलापूर ग्रामीण (पुणे ग्रामीण), अशोक सायकर- सोलापूर ग्रामीण (कोल्हापूर), अरूण फुगे- सोलापूर ग्रामीण (पुणे ग्रामीण).

निवडणूक आयोगाचे निर्देश व पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार बदली झालेल्या ठिकाणी तातडीने हजर होण्याचे आदेशही विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी दिले आहेत.

Back to top button