Maratha Reservation | कुटुंबातील एकाची कुणबी नोंद हवी, रक्तातील इतरांनाही दाखला मिळणार | पुढारी

Maratha Reservation | कुटुंबातील एकाची कुणबी नोंद हवी, रक्तातील इतरांनाही दाखला मिळणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान आढळून आलेल्या कुणबी नोंदी सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर नागरिकांना या नोंदी पाहता येणार आहेत. शासनातर्फे कुणबी नोंद शोधमोहिमेमुळे कुणबी दाखला मिळवणे सोपे झाले आहे. जर कुटुंबातील एका व्यक्तीच्या नोंदीमुळे रक्तसंबधांतील सर्व नातेवाइकांना दाखला मिळण्यास सोपे झाले आहे. जर कुटुंबातील सर्वांना कुणबी दाखला हवा असल्यास रीतसर अर्ज करावा लागणार आहे. त्या अर्जासोबत वंशावळ काढून ती पुराव्यानिशी जुळवावी लागणार आहे. (Maratha Reservation  )

वंशावळ जोडावी लागणार

जर का कुटुंबातील एकाची कुणबी नोंद सापडल्यास थेट रक्तसंबधांतील इतरांनाही कुणबी दाखला मिळणार आहे. यासाठी रितसर अर्ज करावा लागणार आहे. अर्जसोबत वंशावळ (वडील, आजोबा, पणजोबा) ही पुराव्यानिशी जोडावी लागणार आहे. त्याचबरोबर आवश्यक जोडल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांकडून दाखला दिला जात आहे. कुटुंबातील एका नोंदीमुळे रक्तसंबधांतील सर्व नातेवाइकांना दाखला मिळण्यास सोपे झाले आहे. उदा. कुटुंबातील वडिलांची कुणबी म्हणून नोंद मिळाल्यास त्यांच्या मुलगा, मुलगी आणि त्यांची बहीण यांना दाखला मिळणार आहे. कुणबी नोंद शोधमोहिमेनंतर गावनिहाय नावानिशी माहिती जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर कुणबी दाखला काढण्यासाठी सापडलेल्या नोंदीचा पुरावा म्हणून वापर करता येणार आहे.

Maratha Reservation : कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी…

जर का तुम्हाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळवायच असल्यास पुढील अ़टींची पुर्तता करणे गरजेचे आहे

  • जर  १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा या तारखेच्या अगोदर जन्म झालेल्या तुमच्या तुमच्या रक्तनाते संबंधांतील नातेवाइक उदा. तुमचे वडील/ चुलते/आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते /आत्या, आजोबांचे चुलते/आत्या, पणजोबांचे चुलते/ आत्या, खापर पणजोबांचे चुलते/ आत्या इत्यादी नातेवाईकांपैकी एका कोणत्याही नातेवाइकाचा जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा लागणार आहे. वरीलपैकी कोणत्याही नातेवाईकापैकी एकाची जरी कुणबी नोंद आढळल्यास सर्व रक्तातील नात्यांना दाखला मिळणार आहे.
  • कुणबी नोंद शोधण्यासाठी रक्तसंबंधातील नातेवाइकाचा प्राथमिक शाळा प्रवेश किंवा शाळा  सोडल्याचा दाखला पाहिला जात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील व्यक्तींच्या जन्म- मृत्यूची नोंद त्यांच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर १४ मध्ये नोंद केली जात असे. पण कोतवाल पद हे  १ डिसेंबर १९६३ पासून महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीतही कुणबी नोंद शोधली जात आहे. जुन्या कागदपत्रांपैकी वारस नोंदीतही उल्लेख आढळतो.
  • त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असेल, सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा दाखल्यासाठी चालु शखतो. म्हणून या कागदपत्रांचीही तपासणी केली जात आहे.

लवकरच तालुकानिहाय, गावनिहाय कुणबी नोंदी पाहता येणार

जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान आढळून आलेल्या कुणबी नोंदी सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर नागरिकांना या नोंदी पाहता येणार आहेत. त्याचे काम सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले. राज्य शासनाच्या आदेशानंतर जिल्ह्यात 7 नोव्हेंबरपासून सर्व संबंधित कार्यालयात कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने निश्चित केलेल्या कार्यालयाकडील संबंधित दस्तऐवजातून या नोंदी शोधण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 15 हजारांहून अधिक कुणबीच्या नोंदी आढळून आल्या आहेत.

शोध मोहिमेत आढळून येणार्‍या नोंदी सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) या सर्व नोंदी स्कॅनिंग करून ठेवल्या जाणार आहेत. त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर संकेतस्थळावर या नोंदी नागरिकांना पाहता येणार आहेत.

संकेतस्थळावर नोंदी पाहता येणार असल्याने संबंधित नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. तालुकानिहाय, गावनिहाय या नोंदी पाहता येणार आहेत. त्यामुळे संबंधितांना आपल्या नोंदी आहेत की नाही हे समजेल. त्याद्वारे नोंदीच्या प्रमाणित नकला कार्यालयात उपलब्ध करून घेता येणार आहेत. या नोंदीचा कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयोग होणार आहे.

हेही वाचा 

Back to top button