Sugarcane farmers: जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला साखर कारखानदारांनी फिरविली पाठ; ‘दुसरा हप्ता ४०० रुपये द्या’ राजू शेट्टी यांनी आग्रही मागणी | पुढारी

Sugarcane farmers: जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला साखर कारखानदारांनी फिरविली पाठ; 'दुसरा हप्ता ४०० रुपये द्या' राजू शेट्टी यांनी आग्रही मागणी

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा: कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ‘गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये द्यावा’ या मागणीसाठी आज बैठक झाली. जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी संघटनांची बैठक झाली. मात्र या बैठकीला जिल्ह्यातील अनेक चेअरमनांनी पाठ फिरवल्याने ही बैठक निष्फळ ठरली. यावरून साखर कारखानदार दुसरा हप्ता न देण्याच्या ठाम भुमिकेत असल्याचे देखील दिसू लागले आहे.

बैठकीस सुरवात करताना राजू शेट्टी म्हणाले, कृषी मुल्य आयोगाने एफ. आर. पीमध्ये केलेली वाढ ही चुकीची आहे. यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे. शेतक-यांची एक टक्का रिकव्हरी इथेनॅालसाठी घेतल्यानंतर ३०७ रूपये शेतक-यांना दिले जातात. मात्र यामधून कारखान्यांना जादा पैसे मिळतात. वारवांर आंदोलने करून जर पैसे मिळत नसतील, तर मोठा संघर्ष सुरू होईल. आतापर्यंत राज्यातील ८ साखर कारखान्यांनी एफ. आर.पी पेक्षा जादा दर दिलेले आहेत. जिल्ह्यातील साखर कारखाने सक्षम असून, ऊस दर नियंत्रणाच्या मान्यतेची तांत्रिक अडचण कारखानदार सांगून दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत.

सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील साखर कारखान्यांची साखर अडवणूक केली जात आहे. यामुळे पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये दररोज बाचाबाची होवू लागलेले आहे. संघटना आक्रमक झाल्याने तोडफोड करू लागले आहेत. आर. एस. एफ च्या धोरणात केंद्र व राज्य सरकारने चुकीचा हिशोब सादर केलेला असून यामुळे शेतक-यांचे नुकसान होवू लागले आहेत.यावेळी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १५ सप्टेंबर पुर्वी हिशोब पुर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी सर्व कारखान्यांना दिला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. डॅा. जालंदर पाटील , सावकर मादनाईक यांचेसह जिल्ह्यातील काही साखर कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक, साखर सहसंचालक अशोक गाडे , जनार्दन पाटील , वैभव कांबळे , अजित पोवार , सागर शंभुशेटे , विक्रम पाटील , राम शिंदे , शैलेश आडके, यांचेसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Back to top button