Kasari Dam: कासारी धरण ‘ओव्हर फ्लो’च्या मार्गावर; ९७ टक्के पाणीसाठा | पुढारी

Kasari Dam: कासारी धरण 'ओव्हर फ्लो'च्या मार्गावर; ९७ टक्के पाणीसाठा

सुभाष पाटील

विशाळगड : शाहूवाडीतील २१ व पन्हाळा तालुक्यातील ४१ गावांना सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या कासारी मध्यम प्रकल्प २.७७ टीएमसीचा आहे. मंगळवारी (दि २९)  सकाळी ७ वाजता धरण ९७.३४ टक्के भरले आहे. कासारी पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी कासारी धरण ‘ओव्हर फ्लो’ च्या मार्गावर आहे, अशी माहिती कासारी धरण शाखा अभियंता एस.एस.लाड व आय.जी.नाकाडे यांनी दिली.

कासारी मध्यम प्रकल्प २.७७ टीएमसी असून सध्या धरणाची पाणीपातळी ६२२.६० मीटर इतकी आहे. धरणात ७६.४७ दलघमी इतका पाणीसाठा आहे. धरण २.७० टीएमसी म्हणजे ९७.३४ टक्के भरले आहे. कासारी पाणलोट क्षेत्रात आजअखेर ३६९६ मिमी इतका पाऊस बरसला असून गतवर्षी ३६७६ मिमी पाऊस झाला होता. गतवर्षीपेक्षा यंदा २२ मिमी पाऊस जादा झाला आहे, हे या आकडेवारीवरून समोर येते. गेल्या २४ तासांत १८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणातून  पाण्याचा विसर्ग बंद आहे.

कासारी पाणलोट क्षेत्रात गेळवडे या प्रमुख मध्यम प्रकल्पासह कुंभवडे, केसरकरवाडी, पोबरे, पडसाळी व नांदारी हे लघु पाटबंधारे प्रकल्प येतात. हे पाचही लघू प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. गतवर्षी याच दिवशी पाणीसाठा ७६.४७ दलघमी इतका होता. तर धरण २.७० टीएमसी म्हणजे ९७ टक्के भरले होते, अशी माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली.

 हेही वाचा 

Back to top button