E Shivai Bus : स्वारगेटहून कोल्हापूरसाठी धावणार आठ ई-शिवाई बस | पुढारी

E Shivai Bus : स्वारगेटहून कोल्हापूरसाठी धावणार आठ ई-शिवाई बस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वारगेटहून कोल्हापूरसाठी एसटीच्या 8 ई-शिवाई बससेवा पुरविण्यात येणार आहे. ही सेवा शुक्रवारपासून सुरू झाली असून, दिवसभरात या आठ गाड्यांच्या 20 फेर्‍या होणार आहेत. साधारण तासाभराच्या अंतराने स्वारगेट आणि कोल्हापूर स्थानकात या बस प्रवाशांना उपलब्ध असतील, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली.

एसटीच्या पुणे आणि कोल्हापूर विभागाकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. नुकत्याच ताफ्यात दाखल होत असलेल्या पांढर्‍या रंगाच्या इलेक्ट्रिक शिवाई बसद्वारे ही बससेवा सुरू होत आहे. पुणे विभागातून 4 बस व कोल्हापूर विभागातून 4 अशा एकूण 8 बस या मार्गावर धावणार आहेत.

या वेळेनुसार बस उपलब्ध…

स्वारगेट कोल्हापूर : 5.00, 5.30, 6.30, 9.00, 9.30, 10.30, 13.30, 14.30, 15.30, 19.30
कोल्हापूर स्वारगेट : 5.00, 5.30, 6.30, 9.00, 9.30, 10.30, 13.30, 14.30, 15.30, 19.30

हेही वाचा

Pune Metro Update : मेट्रोचे ब्रेक लावल्यावर होणार वीजनिर्मिती; पुण्यातील ‘या’ मार्गावर अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टिम’चा वापर

मुंबई : कल्याण रेल्वे स्थानकात सिग्नल बिघाड; प्रवाशांना फटका

भारताने उभारले जगातील पहिले आपत्कालीन हॉस्पिटल

Back to top button