कोल्हापूर : हद्दवाढीबाबत कठोर निर्णय घ्या : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

कोल्हापूर : हद्दवाढीबाबत कठोर निर्णय घ्या : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर : कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत कठोर निर्णय घ्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हद्दवाढीला विरोध करणार्‍या नेत्यांना सुनावले. हद्दवाढ झाल्याखेरीज विकास होणार नाही. काहीही झाले तरी कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे. काही जण ग्रामीण भागातील लोकांना हद्दवाढीबाबत चुकीचे सांगत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासह हद्दवाढप्रश्नीही बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नानंतर हद्दवाढीबाबत चर्चा होणार होती. बैठकीत गोंधळ झाल्याने ती आटोपती घेण्यात आली. समितीने हद्दवाढीचे निवेदन पवार यांना दिले. पत्रकार परिषदेत त्यांनी हद्दवाढीबाबत भूमिका स्पष्ट केली.

Back to top button