कोल्हापूर: सैनिक टाकळीत भर उन्हातही चुरशीने ४१ टक्के मतदान | पुढारी

कोल्हापूर: सैनिक टाकळीत भर उन्हातही चुरशीने ४१ टक्के मतदान

सैनिक टाकळी; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले लोकसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात मतदान होत आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील एकूण ४ मतदान केंद्रावर भर उन्हातही चुरशीने मतदान झाले. आतापर्यंत ४१ टक्के मतदान झाले आहे.

४ मतदान केंद्रावर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. पोलिंग एजंटामार्फत माहिती घेऊन कार्यकर्ते गावातील अद्याप मतदान न केलेल्या मतदारांना मतदानासाठी घेऊन येत आहेत. एकूण ४ हजार ६६६ मतदानांपैकी दुपारी २.३० वाजेपर्यंत १ हजार ९२६ मतदारांनी आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावला आहे. सायंकाळपर्यंत किमान ६०  टक्के मतांचा टप्पा गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर मतदारांना केंद्रावर हजर राहून मतदान करण्याचे आवाहन ही केले जात आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या विचारधारेतून सुरू केलेल्या अभिनव उपक्रमा अंतर्गत सैनिक टाकळी येथील मतदान केंद्रावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी भव्य आकर्षक मंडप, सेल्फी पॉईंट, आणि सैनिकी परंपरा असलेल्या गावचा इतिहास सांगणारे डिजिटल फलक उभारून मतदान केंद्राला सुशोभित केले आहे. मतदान केंद्रावर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटसोबत सेल्फी घेण्यासाठी तरुण तरुणींसह मतदार गर्दी करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button