कोल्हापूर : केबल चोरी; परप्रांतीयांना अटक | पुढारी

कोल्हापूर : केबल चोरी; परप्रांतीयांना अटक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ताराबाई पार्क येथील जी.एस.टी. भवनच्या नवीन इमारतीच्या दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावरून इलेक्ट्रिकल साहित्यासह कॉपर केबल चोरणार्‍या दोन परप्रांतीय तरुणांना शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. संशयितांकडून चोरीच्या गुन्ह्यातील ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

हरेराम दशरथ विश्वकर्मा (वय 25, रा. ग्राम बरांगा, पोस्ट सायदराजा, जि. चंदोली, उत्तर प्रदेश) व गुलशन साहू (24, रा. ठाकूर दिया ठाण बिलाईगड, जि. बुलावदा बाजार, छत्तीसगड) अशी संशयिताची नावे आहेत. त्याच्याकडून 1 लाख 34 हजार 754 किंमतीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. असे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सांगितले.

मे 2023 ते 15 जुलै या काळात चोरीचा प्रकार घडला होता. ठेकेदार कंपनीमार्फत रवींद्र अरुण पाटील (रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा छडा लावून संशयितांना मुद्देमालासह अटक केली. चोरलेले साहित्य भंगार विक्रेत्यास विक्री केल्याची कबुलीही संशयितांनी दिली.

Back to top button