कोल्‍हापूर : पाण्याबाबतीत दत्तवाड परिसर तिहेरी संकट   | पुढारी

कोल्‍हापूर : पाण्याबाबतीत दत्तवाड परिसर तिहेरी संकट  

दत्तवाड : पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड सह टाकळीवाडी, दानवाड, घोसरवाड आधी परिसर पाण्याच्या बाबतीत तिहेरी संकटात सापडले आहे. एरवी पाण्याच्या बाबतीत समृद्ध समजला जाणारा या भागाला यंदा वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या वर्षी अद्याप या परिसरात एकही जोरदार वळीव पाऊस पडला नाही. शिवाय दूधगंगा नदी पात्र ही वारंवार कोरडे पडत आहे. त्यामुळे पाण्याचे एक मात्र स्त्रोत राहिलेले बोरवेल हे ही अटू लागले आहेत. त्यामुळे या परिसरात पाण्याची आणीबाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पावसाला सुरुवात व्हावी अशी प्रार्थना येथील ग्रामस्थ, शेतकरी वर्ग करीत आहेत.
पाण्याअभावी शेतातील उभी पिके वाळू लागले आहेत. यंदा वळी पावसाने दांडी दिल्याने शिवाय दूधगंगा नदी पात्रात ही पाणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी हक्काचे सोयाबीन पिकाची ही पेरणी केली नाही. गेल्या पाच महिन्यात दूधगंगा नदी पात्र अनेक वेळा कोरडे पडले आहे. सध्या गेले आठ दिवस झाले नदीपात्रात पाणी नाही. त्यामुळे नागरिक व महिलावर्ग विहिरी व बोरच्या पाण्यावर आपली पाण्याची गरज भागवत आहेत. मात्र पावसाने उघडीप दिल्याने व नदीपात्रातही पाणी नसल्याने विहिरीनेही तळ गाठले आहे तसेच गावातील अनेक बोर आटले आहेत. त्यामुळे पाण्याची फारच टंचाई निर्माण झाली आहे.
दत्तवाड येथे ग्रामीण रुग्णालय व शाळांमध्येही पाणी नाही
दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाला व विविध शाळांना पाणीपुरवठा करणारे बोरचे पाणी आटल्याने रुग्णालयात व शाळांमध्येही पाणी नाही. त्यामुळे रुग्णांचे व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. पाण्याची गरज भागवायची कसे असा प्रश्न रुग्णालय व शाळा प्रशासनाला  पडला आहे.
.हेही वाचा 

नाशिक : दै. पुढारीचे अनिल गांगुर्डे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

सातारा : पोवई नाका सुशोभीकरणाचा वाद पेटला

Back to top button