कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

कळे (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : वेतवडे (ता.पन्हाळा) येथे धामणी नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या आदित्य शिवाजी पाटील (वय १३, रा.खेरीवडे, ता.गगनबावडा) या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.२६) सायंकाळच्या सुमारास घडली असून याची नोंद कळे पोलीस ठाण्यात झाली आहे.

अधिक माहिती अशी, आदित्य हा उन्हाळी सुट्टीसाठी आपल्या मामाच्या गावी वेतवडे येथे आला होता. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास तो धामणी नदीपात्रामध्ये अंघोळीसाठी गेला होता. त्याला पोहता येत नव्हते. बराच वेळ झाल्यानंतर तो घरी न परतल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला. नदीकाठी त्याची कपडे आढळून आली. नदीमध्ये शोध घेतला असता सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. याबाबत त्याचा मामा युवराज पाटील यांनी कळे पोलीस ठाण्यात वर्दी दिली.

अधिक वाचा :

Back to top button