डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल; राज्याचे निकालाकडे लक्ष | पुढारी

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल; राज्याचे निकालाकडे लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना 20 ऑगस्ट 2013 या दिवशी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने अवघे राज्य हादरले. दाभोलकरांच्या हत्येनंतर तब्बल आठ वर्षांनी हा खटला सुरू होण्यास मुहूर्त लागला.

हत्येचा तपास पूर्ण होऊन सप्टेंबर 2021 मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयाने पाच आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला सुरू आहे. या खटल्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली आहे. शुक्रवारी (दि. 10) या खटल्याचा निकाल लागणार आहे. निकालाकडे पुणेकरांसह अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

Back to top button