कोल्हापूर : बाजार समितीसाठी राधानगरी तालुक्यात उत्स्फूर्तपणे मतदान! | पुढारी

कोल्हापूर : बाजार समितीसाठी राधानगरी तालुक्यात उत्स्फूर्तपणे मतदान!

गुडाळ (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राधानगरी तालुक्यातील चारही मतदान केंद्रावर दिवसभर उत्स्फूर्तपणे मतदान झाले.

विकास संस्था गटात तालुक्यातील 199 विकास संस्थेच्या 2395 मतदारांपैकी 2173 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. तर ग्रामपंचायत गटात तालुक्यातील 98 ग्रामपंचायतीमधील 922 ग्रामपंचायत मतदारांपैकी 893 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

तालुक्यात कसबा तारळे, शेळेवाडी, राधानगरी आणि राशीवडे या चार मतदान केंद्रावर विकास संस्था आणि ग्रामपंचायत गटाचे मतदान झाले. बाजार समितीच्या निवडणुकीत राधानगरी तालुक्यातील तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी शिवाजीराव पाटील (कसबा तारळे) यांनी ग्रामपंचायत गटातून तर सोनाली शरद पाटील (अर्जुनवाडा) यांनी विकास संस्था गटातून राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीतून निवडणूक लढवली. तर बळवंत सदाशिव पाटील (चंद्रे) यांनी विकास संस्था गटातून शिव शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीतून निवडणूक लढविली.

तालुक्यातील चारही मतदान केंद्रावर गटवार झालेले मतदान असे, कसबा तारळे केंद्र (ग्रामपंचायत गट 279 पैकी 279,विकास संस्था गट 692 पैकी 639) शेळेवाडी केंद्र (ग्रामपंचायत गट 205 पैकी 200, विकास संस्था गट 485 पैकी 461) राधानगरी केंद्र (ग्रामपंचायत गट 261 पैकी 240, विकास संस्था गट 582 पैकी 467) राशीवडे केंद्र( ग्रामपंचायत गट 177 पैकी 174, विकास संस्था गट 636 पैकी 606)

अधिक वाचा :

Back to top button