कोल्हापूर : मजरेवाडी परिसरात तरुणाचा निर्घृण खून | पुढारी

कोल्हापूर : मजरेवाडी परिसरात तरुणाचा निर्घृण खून

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : मजरेवाडी (ता. शिरोळ) हद्दीतील बीपीएड कॉलेज लगतच्या शेतात एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना घडली. आज (दि. १८) मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. खुनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सावकार कलाप्पा देबाजे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, घटनास्थळी सपोनी बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील दाखल झाले आहेत. बघ्यांनी मोठी गर्दी केली असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावकार देबाजे काल दुपारपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेणे सुरू होते. त्याचा मेहुणा माणिक पुजारी याला त्याची मोटरसायकल (एम.एच. 09 बीडी 5251) बीपीएड कॉलेजच्या रस्त्यावर दिसली. तेथीलच शेतातील काटेरी झुडपात त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे. गुजरेवाडी व कुरुंदवाड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

हेही वाचा

Back to top button