कोल्हापूर : शिवाजी मंडळ, ‘पीटीएम’च्या दीडशे समर्थकांवर गुन्हे दाखल | पुढारी

कोल्हापूर : शिवाजी मंडळ, ‘पीटीएम’च्या दीडशे समर्थकांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर शिवाजी मंडळ व पाटाकडील तरुण मंडळ समर्थकांत झालेली मारामारी व विनापरवाना मिरवणूक काढल्याप्रकरणी दोन्हीही मंडळांच्या प्रमुखांसह दीडशे जणांविरुद्ध जुना राजवाडा पोलिसांत रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मारामारी व हुल्लडबाजी प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या संशयितांत सर्वाधिक विद्यार्थी, उच्चशिक्षित तरुण व खेळाडूंचा समावेश आहे. भविष्यात त्यांना कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची भीती पालकवर्गातून व्यक्त होत आहे.

पीटीएम व शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील अंतिम सामन्यानंतर खरी कॉर्नर परिसरात दोन्ही संघाचे समर्थक परस्परांना भिडले. त्यांच्यामध्ये प्रचंड वादावादी, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासह लाथा-बुक्क्यांनी मारहाणीचे प्रकार घडल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला.

प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी घटनेची दखल घेत दोन्हीही मंडळांच्या प्रमुखांसह समर्थकांविरुद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाईचे आदेश जुना राजवाडा पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार दीडशे जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हे दाखल झालेल्यात संपत आनंदराव जाधव (मंगळवार पेठ), त्रिवेंद्र श्रीराम नलावडे, शरद गणपतराव पवार, ऋषीकेश मेथे-पाटील, प्रथमेश विजय हेरेकर, अक्षय रवींद्र पायमल, यश नामदेव देवणे, सैफ रमजान हकिम, प्रतीक कुमार बदामे, अक्षय गणेश मेथे-पाटील, शाहिद राजू महालकरी, रोहित प्रकाश देसाई, ओंकार सुरेश पाटील, ओमकार शिवाजी मोरे, ओमकार संभाजी जाधव, कैलास महादेव पाटील, ऋषभ राजेंद्र ढेरे, शोएब इम्तियाज बागवान, प्रेम प्रकाश देसाई, अजिंक्य राजेंद्र नलवडे, ध्वनिक्षेपक मालक सागर गवळी, रोहित ऊर्फ बॉबी मोरे, अभिषेक इंगवले, राहुल जांभळे, निखिल कोराणे, सुयश हांडे, अनिकेत घोटणे, दीपक थोरात, सुमित जाधव, विशाल जाधव, रोहित देसाई, सचिन पाटील, राजू पाटील आदींचा समावेश आहे.

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?