Kolhapur : कुरुंदवाड येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी | पुढारी

Kolhapur : कुरुंदवाड येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : अहिंसेचे पुजारी, पंचशील गुणांची शिकवण देणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती कुरुंदवाड शहरात विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने कुरुंदवाडकरांचे लक्ष वेधले. दरम्यान पालिका सभागृहात भगवान महावीर यांच्या प्रतिमेला मुख्याधिकारी तथा प्रशासक आशिष चौहान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निशिकांत ढाले, योगेश गुरव, प्रदीप बोरगे, नंदकुमार चौधरी आदी उपस्थित होते. (Kolhapur)

येथील जैन समाजाच्या वतीने दिगंबर, श्वेतांबर जैन बांधव एकत्र येऊन दरवर्षी भगवान महावीरांची जयंती भक्तीभावाने व उत्साहात साजरी करतात.सोमवारी सकाळी 6 वाजता श्री.1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात जिंनगोंड पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर जैन समाजाच्या वतीने भगवान महावीरांची पालखीसह शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशात समाजबांधव सहभागी झाले होते.

ही शोभायात्रा पोमाजे-जोंग गल्ली,गोठणपूर गल्ली,पाटील गल्ली,पालिका चौक परिसरातून फिरून पार्श्वनाथ मंदिरात विसर्जित झाली. या शोभायात्रेत माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील दादासाहेब पाटील,धनपाल आलासे, जवाहर पाटील अभिजीत पाटील बाळासाहेब दिवटे,अरुण भबीरे,अक्षय आलासे, अभिजीत पाटील,दीपक पोमाजे,अजित पाटील,किरण आलासे,सुरेश बिदगे,शरद आलासे,बंडू उमडाळेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button