कोल्हापूर : पंचगंगा घाटाचे दगड निखळले | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगा घाटाचे दगड निखळले

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक पंचगंगा घाटावरील पायर्‍यांसाठी बसविण्यात आलेले दगड निखळू लागले आहेत. महाराष्ट्रासह परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात येणारे भाविक पंचगंगा नदीत स्नान करून देवदर्शनासाठी जातात. पायर्‍यांचे दगड निखळल्याने जीवितहानी होण्याची शक्यता आहे. परिणामी घाटाचे मजबुतीकरण करण्याची आवश्यकता आहे.

पंचगंगा घाट कोल्हापूरचे वैभव असल्याने यापूर्वी सुशोभीकरणासाठी अनेकवेळा प्रस्ताव तयार करण्यात आले. काही प्रस्तावानुसार निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. परंतु अद्याप कामाचा पत्ता नाही.

देखभाल-दुरुस्तीअभावी घाटाचे दगड निखळू लागले आहेत. यापूर्वी पंचगंगा घाटाचा बुरूज ढासळला होता. पर्यावरणप्रेमींच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासनाने या बुरुजाची दुरुस्ती केली. घाटाचेही मजबुतीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

Back to top button