कोल्हापूर : ट्रॅक्टरट्रॉली कालव्यात पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : ट्रॅक्टरट्रॉली कालव्यात पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू

कसबा वाळवे, पुढारी वृत्तसेवा : तळाशी ता.राधानगरी येथे कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू आहे. शुक्रवारी (दि.१७) दुपारी ट्रॅक्टर ट्रॉली कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहात पलटी झाली. या अपघातात सुरेश उर्फ सतीश बळवंत पाटील (वय ३०) या चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला.

गेली दोन महिन्यांपासून दूधगंगा नदीवरील डाव्या कालव्याचे अस्तरीकरणाचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मागणीवरून कालव्याला पाणी सोडल्याने गेली तीन दिवस अस्तरीकरण काम बंद होते. या कामावर पाणी मारण्यासाठी ड्रायव्हर म्हणून सतीश पाटील हे काम करत होते. आज दुपारी दोनच्या दरम्यान कालव्याच्या वरील कच्च्या रस्त्यावरून ट्रॅकटरट्रॉली घेऊन जाताना ट्रॅकटरट्रॉली कालव्याच्या प्रवाहात पलटी झाली.

चालक सतीशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी त्याला जखमी अवस्थेत पाण्याबाहेर काढले. ग्रामस्थांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेल्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचंलत का?

Back to top button