बहुमत आमच्याकडे असल्याने आयोगाने अपेक्षित निर्णय दिलेला आहे : एकनाथ शिंदे | पुढारी

बहुमत आमच्याकडे असल्याने आयोगाने अपेक्षित निर्णय दिलेला आहे : एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत असून हा लोकशाहीचा विजय आहे, बाबासाहेबांच्या घटनेचा विजय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१७) केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था या स्वतंत्र यंत्रणा आहेत, त्यांच्यावर आरोप करणे हे चुकीचे आहे. असे सांगून शिंदे म्हणाले, मेरीट, बहुमत आमच्याकडे असल्याने आयोगाने अपेक्षित निर्णय दिलेला आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला अधिक महत्व आहे. तसेच स्वतःमध्ये सुधारणा करा, आत्मचिंतन करा असा सल्लाही त्यांनी यावेळी ठाकरेंना दिला.

ते पुढे म्हणाले, अनेक आमदार, खासदार, नेते यांचा हा विजय आहे असून सत्य लपून राहत नाही आणि ते टाळताही येत नाही. ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार कुणाच्यातरी दावणीला बांधले त्या पापाचे हे फळ आहे. आणि म्हणूनच दुसऱ्या पक्षाकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आज सोडवून घेण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हे वाचलंत का? 

 

Back to top button