कोल्हापूर : शाहूवाडीत गव्याच्या हल्ल्यात तरुण शेतकरी गंभीर | पुढारी

कोल्हापूर : शाहूवाडीत गव्याच्या हल्ल्यात तरुण शेतकरी गंभीर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गवा रेड्याच्या हल्ल्यात वाकोली (ता. शाहूवाडी) येथील तरुण शेतकरी जखमी झाला. तानाजी धोंडिबा आरसेकर (वय 36) असे त्यांचे नाव आहे. पोटावर, पाठीवर इजा झाल्याने प्रकृती गंभीर बनली आहे. बुधवारी (दि. 18) सकाळी ही घटना घडली. सीपीआर रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तानाजी हे सकाळी शेतात उसाला पाणी देत असताना अचानक पाठीमागून आलेल्या गव्याने त्यांना धडक देऊन उधळून टाकले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारार्थ हलविण्यात आले. शाहूवाडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

Back to top button