कोल्हापूर : अत्याचारप्रकरणी इचलकरंजीतील एकास 10 वर्षे सक्तमजुरी शिक्षा | पुढारी

कोल्हापूर : अत्याचारप्रकरणी इचलकरंजीतील एकास 10 वर्षे सक्तमजुरी शिक्षा

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा :  अर्धांगवायूने आजारी असलेल्या महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी रमजान बाबालाल सय्यद (रा. सुतार मळा, इचलकरंजी) याला येथील सत्र न्यायाधीश एम. आर. नेर्लेकर यांनी दोषी ठरवून 10 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. व्ही. जी. सरदेसाई यांनी काम पाहिले.

13 मे 2016 रोजी सय्यदने पीडित महिलेवरअत्याचार केला. या प्रकरणी संकेत लगारे याने गावभाग पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार तत्कालीन तपास अधिकारी श्री. श्री. रानमाळे व धर्मे यांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकार पक्षातर्फे फिर्यादी, पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वैद्यकीय अधिकारी असे 13 साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सरदेसाई यांनी मांडलेला युक्तिवाद व सादर पुरावे ग्राह्य मानून सय्यद याला 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी तसेच कलम 452 अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सात दिवस सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली.

Back to top button