आयुष्याचे एव्हरेस्ट शिखर काबीज करून त्यावर कुटुंब, देशाचा झेंडा फडकवा : मृणाल कुलकर्णी | पुढारी

आयुष्याचे एव्हरेस्ट शिखर काबीज करून त्यावर कुटुंब, देशाचा झेंडा फडकवा : मृणाल कुलकर्णी

कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी आयुष्याचे एव्हरेस्ट शिखर काबीज करून त्यावर ठामपणे आपले कुटुंब आणि देशाचा झेंडा फडकवावा, असे आवाहन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 57 वे प्रदेश अधिवेशन उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रदेशमंत्री अ‍ॅड. अनिल ठोंबरे उपस्थित होते. ‘अभाविप’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अल्लम प्रभू म्हणाले, एकात्मता व राष्ट्रीय सुरक्षेसाठी ‘अभाविप’चे कार्य सुरू आहे. राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत. उद्योजक सुधीर मुतालिक म्हणाले, काही वर्षांपूर्वी देशाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. परंतु, आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनत आहे. एव्हरेस्ट वीरांगना कस्तुरी सावेकर म्हणाल्या, एव्हरेस्ट शिखर सर केले तरी पाय जमिनीवरच आहेत.

निसर्गासमोर कायम नम्रपणे राहणे गरजेचे आहे. चेबर्स ऑफ कॉमर्सचे राज्याध्यक्ष ललित गांधी म्हणाले, ऑनलाईनपेक्षा स्थानिक दुकानांतून वस्तू खरेदी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला युवकांनी हातभार लावावा. प्रदेशाध्यक्ष निर्भकुमार विसपुते यांचे भाषण झाले. सचिन शिरगावकर यांनी स्वागत केले. प्रसन्न म्हाकवेकर यांनी सूत्रसंचालन केले. दिग्विजय गरड यांनी आभार मानले. शनिवारी (दि.24) दुपारी चार वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता मिरजकर तिकटी येथे जाहीर सभा होणार आहे.

Back to top button