कोल्हापूर : चिन्या हळदकर खुनातील 3 फरारी संशयितांना अटक | पुढारी

कोल्हापूर : चिन्या हळदकर खुनातील 3 फरारी संशयितांना अटक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राजारामपुरी परिसरातील सराईत गुन्हेगार संदीप ऊर्फ चिन्या अजित हळदकर (रा. शाहूनगर) याच्या खुनातील तिघा फरारी संशयितांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. सुरज अरुण पाटील (वय 27, रा. दौलतनगर), राहुल शिवलंब भिसे (24, उजळाईवाडी), विश्वजित सुरेश निकम (दौलतनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. अटकेतील एकूण आरोपींची संख्या आता 11 झाली आहे.

गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड नावावर असलेल्या चिन्या हळदकरचा राजारामपुरी परिसरातील संतप्त जमावाने पाठलाग करून यादवनगर येथे दगडाने ठेचून खून केला होता. 24 सप्टेंबरला रात्री उशिरा ही घटना घडली होती. याप्रकरणी मुख्य संशयित अभिषेक म्हेतर, महेश नलावडे, रोहन पाटील, शुभम कदमसह 8 जणांना अटक केली होती. मात्र सुरज पाटील, राहुल भिसे, विश्वजित निकम हे तिघे संशयित फरारी होते. गुरुवारी रात्री सुरू केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये फरारी संशयित सापडल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.

Back to top button