‘हर घर संविधान’ उपक्रमासाठी महाराष्ट्र सामाजिक परिवर्तचे मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन | पुढारी

'हर घर संविधान' उपक्रमासाठी महाराष्ट्र सामाजिक परिवर्तचे मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन

कबनूर (कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा : देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी जनतेत देशप्रेमाची भावना सुनिश्चित करण्यासाठी ” हर घर तिरंगा ” उपक्रम राबविला. त्याच प्रमाणे संविधानचा अभ्यास, संविधान मुळे मिळालेले अधिकार, नागरिकांची कर्तव्ये व त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ” हर घर संविधान संविधानचा अभ्यास, संविधान मुळे मिळालेले अधिकार, नागरिकांची कर्तव्ये व त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ” हर घर संविधान ” उपक्रम राबवावा ” उपक्रम राबवावा अशी मागणी महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कदम व सरचिटणीस प्रा. अशोक कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.  मुख्यमंत्री शिंदे यांनी सदर निवेदनाची माहिती घेऊन कार्यवाही करावी असे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत.

या निवेदनात म्‍हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फूले, राजष्री शाहू महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जो परिवर्तनवादी विचार रुजविला जातो, तो​ देशाच्या काना कोपऱ्यात​ पोहोचत असतो. या उपक्रमाने देशात महाराष्ट्राची मान उंचावून आपला महाराष्ट्र परिवर्तन -वादी महाराष्ट्र आहे हे यातून सिध्द होईल. प्रत्येक कुटूंबाला संविधानाचे वाचन करता येईल व राज्यात सदृढ व जबाबदार नागरिक तयार होतील यासाठी राज्यातील प्रत्येक घरात संविधान प्रत द्यावी व महाराष्ट्र राज्याला एक नवी दिशा द्यावी​ असेही​ निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button