कोल्हापूर : संयोगिताराजे घाटगे यांचे निधन | पुढारी

कोल्हापूर : संयोगिताराजे घाटगे यांचे निधन

कागल; पुढारी वृत्तसेवा : येथील ज्युनिअर कागलकर राजघराण्यातील श्रीमंत संयोगिताराजे अजितसिंहराजे घाटगे (वय ९३) (कागल ज्युनिअर) यांचे निधन झाले. येथील श्री शिवराय शिक्षण प्रसारक मंडळ, कागलचे अध्यक्ष श्रीमंत मृगेंद्रसिंहराजे घाटगे यांच्या त्या आई, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक व श्रीमंत अखिलेशराजे घाटगे यांच्या त्या आजी होत. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी येथील ऐतिहासिक काकासाहेब वाड्यात ठेवण्यात आले होते.

यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, विरेंद्रसिंह घाटगे, स्वरूप महाडिक तसेच सावंतवाडीकर सरकार, नेर्लीकर सरकार, खानविलकर सरकार, दत्तवाडकर सरकार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संयोगिताराजे या कोल्हापूर शहरातील विविध क्लबच्या मेंबर होत्या. येथील खासबाग परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सूना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (दि.१३) सकाळी १० वाजता कागल येथील खासबाग येथे आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button