कोल्हापूर : डॉ. सुधा मूर्ती यांनी घेतले नृसिंहवाडीत दत्त दर्शन | पुढारी

कोल्हापूर : डॉ. सुधा मूर्ती यांनी घेतले नृसिंहवाडीत दत्त दर्शन

नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा :  इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुधा मूर्ती सोमवारी नृसिंहवाडीत दत्त दर्शनासाठी आल्या होत्या. कोणताही बडेजाव न करता सामान्य भक्तांप्रमाणे त्यांनी दत्त दर्शनाचा आनंद लुटला व भाविक, नागरिकांना सुखद धक्का दिला.

 ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू असूनही कोणत्याही सुरक्षेविना त्या आल्या होत्या. सुधा मूर्ती यांच्यासोबत त्यांच्या भगिनी होत्या. त्यांनी दत्त महाराजांची अभिषेक, पूजा करून प्रार्थना केली. यावेळी दत्त देवस्थानच्या वतीने त्यांचा दत्त प्रतिमा व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, दत्त देव संस्थानचे अध्यक्ष सदाशिव जेरे पुजारी, विश्वस्त संतोष खोंबारे, संजय पुजारी, वैभव पुजारी उपस्थित होते.

Back to top button