अंबाबाई दर्शन पेड ई-पासला कोर्टाने परवानगी नाकारली | पुढारी

अंबाबाई दर्शन पेड ई-पासला कोर्टाने परवानगी नाकारली

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देवस्थान समितीने केलेल्या दर्शन पेड ई-पासला न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सर्वच भाविकांना दर्शन रांगेतूनच देवीचे दर्शन घ्यावे लागणार आहे.

व्हीआयपी भाविकांना स्वतंत्र रांग नको, असाही आदेश न्यायालयाने सोमवारी दिला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना पत्रकार परिषदेमध्ये न्यायालयाच्या आदेशाबाबत वक्तव्य करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला न्यायालयाने दिला. अंबाबाईच्या तातडीने दर्शनासाठी जिल्हा प्रशासन व देवस्थान समितीने यंदा 200 रुपयांचा दर्शन पेड ई-पास देण्याचा निर्णय घेतला होता. त्याला काहींचा विरोध होता. गजानन मुनिश्वर यांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायाधीश के. आर. सिंघल यांनी या दर्शन पेड ई-पासला परवानगी नाकारली.

Back to top button