अलमट्टीतून २ लाख २५ हजार विसर्ग सुरूच : कृष्णा, पंचगंगेच्या पातळीत घट | पुढारी

अलमट्टीतून २ लाख २५ हजार विसर्ग सुरूच : कृष्णा, पंचगंगेच्या पातळीत घट

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून २ लाख २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता. दरम्यान, पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणातील विसर्ग आज (दि. १५) सकाळी ८ वाजता कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा, पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी होण्यास मदत होणार आहे.

अलमट्टीची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी इतकी आहे. सध्या धरणात १००. ६३९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणे ८१.८१ टक्के भरले आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार कायम आहे. दरम्यान मागील दोन दिवसांपासून पावसाची जोर ओसरला आहे. त्यामुळे तीव्र पूर परिस्थिती टळली आहे. त्यातच अलमट्टी धरण व्यवस्थापन आणि कोल्हापूर, सांगली जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवल्याने संभाव्य बिकट पूरपरिस्थिती टळण्यास मदत झाली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button