राधानगरी धरणाचे बंद झालेले दोन दरवाजे पुन्हा झाले खुले | पुढारी

राधानगरी धरणाचे बंद झालेले दोन दरवाजे पुन्हा झाले खुले

राधानगरी पुढारी वृत्तसेवा : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे बंद झालेले दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत. चार दरवाजांतून 5712 क्युसेक तर खासगी वीजगृहातून 1600 क्युसेक असा एकूण 7312 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे.

राधानगरी धरणाचे बुधवारी चार दरवाजे खुले झाले होते. दुपारनंतर पावसाने थोडी उघडीप दिल्यामुळे रात्री व आज पहाटे दोन दरवाजे बंद झाले होते. आज सकाळपासून पुन्हा पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे दुपारी ४ वाजता क्रमांक तीन व ४ वाजून १५ मिनीटांनी क्रमांक चार दरवाजा खुला झाला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button