आशिष नेहरा ट्रेंडिंग: पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक नीरज चोप्राला म्हणाले आशिष नेहरा, मग काय सेहवागने उडवली त्याची खिल्ली | पुढारी

आशिष नेहरा ट्रेंडिंग: पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक नीरज चोप्राला म्हणाले आशिष नेहरा, मग काय सेहवागने उडवली त्याची खिल्ली

पुढारी ऑनलाईन: भारताचा माजी क्रिकेटर आणि वेगवान गोलंदाज आशिष नेहरा सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. खरे तर हे प्रकरणच असे आहे की, लोकांना नेहराची चेष्टा केल्याशिवाय राहवत नाही. पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक आणि तज्ज्ञ झायेद हमीद यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकल्याबद्दल पाकिस्तानच्या अर्शद नदीमचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

 

मात्र, अभिनंदन करण्याच्यावेळी ते नीरज चोप्रा आणि आशिष नेहरा यांच्याबद्दल गोंधळून गेला. झायेद हमीद यांनी अर्शदची तुलना भारतीय भालाफेकपटूशी केली, मात्र ही तुलना करताना त्यांनी नीरज चोप्राच्या जागी आशिष नेहराचे नाव लिहिले. यानंतर बुधवारी सोशल मीडियावर आशिष नेहराबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे मीम बनवण्यात आले आणि लोकांनी त्यावर खूप कमेंटही केल्या. इतकेच नाही तर आशिष नेहरासोबत खेळणाऱ्या वीरेंद्र सेहवागनेही त्याची खिल्ली उडवली.

झायेदचे हे ट्विट दोन चुकांमुळे व्हायरल होत आहे. सर्वप्रथम, नीरज बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सचा भागही नव्हता, तर झायेदने लिहिले की अर्शदने एका भारतीय खेळाडूला पराभूत केले. दुसरे कारण म्हणजे त्याने नीरज चोप्राऐवजी आशिष नेहराचे नाव लिहिले.

वास्तविक पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शदने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये 90 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर पाकिस्तानी राजकीय विश्लेषक झायेद यांनी लिहिले – हा विजय देखील नेत्रदीपक आहे कारण पाकिस्तानी खेळाडूने भारताचा हिरो आशिष नेहराचा पराभव केला.

यानंतर वीरेंद्र सेहवागने गंमतीने आशिष नेहराची तुलना इंग्लंडचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ऋषी सुनक यांच्याशी केली. सेहवागने लिहिले- चिचा, आशिष नेहरा सध्या यूकेमध्ये पंतप्रधानपदाच्या निवडणुकीची तयारी करत आहे. त्यामुळे निश्चिंत रहा.

त्याच वेळी, भारत रामराज नावाच्या सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले – झायेदच्या म्हणण्यानुसार, नीरज (त्याच्या मते नेहरा) बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी झाला होता. ही नवीन आणि मोठी बातमी आहे. झायेद हमीदचे ट्विटर अकाउंट भारतात बॅन आहे. मात्र, त्याच्या ट्विटचा स्क्रीन शॉट चांगलाच व्हायरल होत आहे.

 

 

खरे तर नदीम आणि चोप्रा खूप चांगले मित्र आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नदीमने 90 मीटर भालाफेक केल्यानंतर नीरजने सर्वप्रथम त्याचे अभिनंदन केले. अर्शदने कॉमनवेल्थ गेम्समध्ये वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्सचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. नदीम गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणि बर्मिंगहॅम गेम्सच्या एक आठवडा आधी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही पदकांपासून वंचित राहिला होता. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याचवेळी नीरजने जागतिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.

Back to top button