कोल्हापूर : कळे येथे ब्रेक फेल होऊन वाळूचा ट्रक पलटी | पुढारी

कोल्हापूर : कळे येथे ब्रेक फेल होऊन वाळूचा ट्रक पलटी

कळे : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर कळे (ता.पन्हाळा) येथील दस्तुरी चौकाजवळ कोकणातून कोल्हापूरकडे निघालेला सिलिका वाळूचा ट्रक ब्रेक फेल झाल्यामुळे उसाच्या शेतात पलटी झाला. शुक्रवारी (ता.२२) पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अंदाजे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

अधिक माहिती अशी, ट्रक चालक सुरेश किसन राठोड (वय ४२ रा. जांभळवाडी-कासार्डे ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) हा अशोक लेलँड ट्रक (क्र.एम एच ०७ ए जे ७७३) घेऊन इचलकरंजीकडे सीलिका वाळू भरून निघाला होता. कळे येथील दस्तुरी चौकाच्या अलीकडे आला असता ब्रेक फेल आणि स्टिअरिंग लोक होऊन उजव्या बाजूला वळण घेऊन १० ते १५ फूट खोल असलेल्या उसाच्या शेतामध्ये पलटी झाला. यावेळी चालक ट्रक बाहेर फेकला गेल्याने बचावला. अपघाताची नोंद कळे पोलीस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button