रणवीरच्या न्यूड फोटोंची दीपिकाला आधीच कल्पना होती? Deepika Padukone on Ranveer Singh Nude photo | पुढारी

रणवीरच्या न्यूड फोटोंची दीपिकाला आधीच कल्पना होती? Deepika Padukone on Ranveer Singh Nude photo

मुंबई : पुढारी ऑनलाईन – रणवीर सिंगच्या न्यूड फोटो शूटने इंटरनेटवर धुमाकूल घातला आहे. रणवीरने पेपर या मासिकासाठी त्याने हे फोटोशूट केले आहे. हे फोटो अनेकांना आवडले आहेत तर दुसरीकडे अनेकांनी रणवीरला ट्रोलही केले आहे. पण त्याची बायको दीपिका पदुकोन हिला या फोटोशूटबद्दल काय वाटले असेल? या फोटोशूटबद्दल तिला माहिती होते का? (Deepika Padukone on Ranveer Singh Nude photo)

इंडिया टुडेने यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध केलेली आहे. हे फोटोशूट काही आठवडे आधी घेण्यात आले होते पण रणवीर इतर प्रोजेक्टवर व्यस्त असल्याने हे फोटो काल प्रसिद्ध करण्यात आले असे या वृत्तात म्हटले आहे. रणवीरशी संबंधीत एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “रणवीरने अशा प्रकारचे फोटो अगदीच नवीन नाहीत. रणवीरने विविध प्रकारच्या फॅशनचे प्रयोग यापूर्वी केलेले आहेत. त्याच्या फॅशनवर टोकाच्या प्रतिक्रिया यापूर्वीही आलेल्या आहेत. पण रणवीरला हा प्रोजेक्ट करायचा होता. याबद्दल त्याची भूमिका स्पष्ट होती.”
मे-जूनमध्येच हे फोटो तयार होते, पण रणवीरला थो़डं वाट पाहावं असे वाटत होते.

दीपिका पदुकोनची प्रतिक्रिया?

रणवीरची बायको दीपिका पदुकोन हिला या प्रोजेक्टची कल्पना होती, अशी माहिती या सूत्रांनी दिलेली आहे. “हे फोटो दीपिका आवडले. सोशल मीडियावर हे फोटो रिलिज होण्यापूर्वीच दीपिकाला दाखवण्यात आले होते. दीपिका नेहमीच रणवीरला साथ देते. रणवीरला जेव्हा वेगळे काही करायचे असते तेव्हा ती त्याच्या पाठीशी असते.”

हे वाचलं का?

Back to top button