शाहू समाधीस्थळ सुशोभीकरण; राज्य सरकारचे 9 कोटी 40 लाख : सतेज पाटील | पुढारी

शाहू समाधीस्थळ सुशोभीकरण; राज्य सरकारचे 9 कोटी 40 लाख : सतेज पाटील

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राजर्षी शाहू छत्रपतींच्या समाधी स्थळाच्या सुशोभीकरणासाठी 9 कोटी 40 लाख 56 हजार 108 रुपयांच्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

महापालिकेने राजर्षी शाहू छत्रपतींचे समाधी स्मारक नर्सरी बागेत उभारले आहे. स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसर्‍या टप्प्यातील कामासाठी सामाजिक न्याय विभागाकडून आवश्यक निधी मिळाल्याने काम जलदगतीने पूर्ण होणार आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची स्मृती शताब्दी नुकतीच झाली. स्मृती शताब्दीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून पाच कोटींचा निधी यापूर्वीच दिला असून यातून विविध उपक्रम राबवले जात आहेत, असेही पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

दुसर्‍या टप्प्यात होणारी कामे…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल नूतनीकरण हॉलमध्ये आर्ट गॅलरी, डॉक्युमेंटरी दाखविण्याची सोय दलितमित्र दादासाहेब शिर्के उद्यान कंपाऊंड वॉल, लँडस्केपिंग पार्किंग सुविधा तसेच टॉयलेटस् बांधणी परिसरातील सात समाधी, दुरुस्तीसह नूतनीकरण.

Back to top button