जिल्ह्यात नोंदणीकृत सावकारांकडूनही लूट | पुढारी

जिल्ह्यात नोंदणीकृत सावकारांकडूनही लूट

सांगली : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात नोंदणीकृत 700 च्या वर सावकार आहेत. यातील दोषी असलेल्यांपैकी गेल्या आठ वर्षांत एकालाही शिक्षा लागलेली नाही. त्यामुळे कायद्यातील पळवाट शोधत त्यांच्याकडून सामान्यांची लूट सुरू आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी 753 नोंदणीकृत सावकार होते. या सावकारांनी जिल्ह्यात 47 हजार 827 जणांना सुमारे 72 कोटी 16 लाखांचे कर्जवाटप केले आहे. त्यात 215 शेतकर्‍यांना 17 लाख 11 हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. राज्य सरकारने विनापरवाना सावकारी करणार्‍यास पाच वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद केली. त्यामुळे बेकायदेशीर वा अवैध सावकारीला निश्चितपणे लगाम बसेल, अशी आशा होती. मात्र ती फोल ठरल्याचे दिसत आहे.

नोंदणीकृत सावकारांच्या संदर्भात सहकार विभागाकडे गेल्या काही वर्षांत 16 प्रकरणांत सुनावणी होऊन अकरा प्रकरणे निकालात काढण्यात आली. त्यात केवळ दोघांना त्यांची मालमत्ता परत मिळाली. बाकी अर्जादारांचा दावा फेटाळून लावण्यात आला. त्यावरून या कायद्याची कितपत आणि कशी अंमलबजावणी होते हे दिसून येत आहे.

Back to top button