कोल्हापूर : नानीबाई चिखलीमध्ये विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय | पुढारी

कोल्हापूर : नानीबाई चिखलीमध्ये विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय

नानीबाई चिखली : पुढारी वृत्तसेवा : विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, या करिता विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय नानीबाई चिखली ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे. संपूर्ण राज्यभरात हा निर्णय लागू करणारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल तालुक्यामध्ये विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव करणारे नानीबाई चिखली हे पहिले गाव ठरलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये सर्वप्रथम विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय काही गावांमध्ये घेण्यात आल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने संपूर्ण राज्यभरात असा कायदा करावा, असे परिपत्रक काढले होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल तालुक्यामध्ये असा निर्णय होत नव्हता; पण अखेर नानीबाई चिखली ग्रामपंचायतीने याबाबत निर्णय घेऊन या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच छाया चव्हाण व उपसरपंच विजय घस्ती यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. ग्रा. पं. सदस्य श्रीशैल नुल्ले यांनी हा ठराव मांडला. तर युवराज कुंभार यांनी त्यास अनुमोदन दिले.

हेही वाचलंत का ?  

 

Back to top button