पुढारी कस्तुरी क्लब-कलर्स मराठीतर्फे जयसिंगपूरमध्ये हळदी-कुंकू सोहळा | पुढारी

पुढारी कस्तुरी क्लब-कलर्स मराठीतर्फे जयसिंगपूरमध्ये हळदी-कुंकू सोहळा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

दै.‘पुढारी’ कस्तुरी क्लब आणि कलर्स मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेल गाणी, धमाल गेम्स, कलर्स मराठीवरील कलाकारांशी प्रत्यक्ष संवाद आणि चैत्र गौरी हळदी-कुंकू असा मनोरंजनाचा चौफेर धमाका जयसिंगपूरमध्ये महिलांना अनुभवण्यास मिळणार आहे.

बुधवार दि. 4 मे 2022 रोजी दुपारी 3 वाजता या धमाल कार्यक्रमाचे आयोजन शाहूनगर, नगरपालिका हॉल, नांदणी रोड, जैन मंदिराच्या मागे, जयसिंगपूर येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमात कलर्स मराठीवरील ‘आई-मायेचं कवच’ या मालिकेतील मानसिंग म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता विशाल निकम याला प्रत्यक्ष भेटण्याची, त्याच्याशी संवाद साधण्याची संधी उपस्थित महिलांना मिळणार आहे. तसेच चैत्र गौरीचे हळदी-कुंकू महिलांना कैरीचे पन्हे, कोशिंबीर देऊन साजरे करण्यात येणार आहे. हळदी- कंकू असल्याने कार्यक्रमात कलर थीम असून लाल, हिरवा किंवा पिवळ्या रंगांतील साड्यांमध्ये महिलांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. हळदी-कुंकू समारंभासोबतच प्रल्हाद विक्रम प्रस्तुत गाण्याचा सुरेल कार्यक्रम आणि फनी गेम्सची मजा एकाच कार्यक्रमात महिलांना घेता येणार आहे. या धमाल खेळातून महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमास अस्सल मराठमोळ्या वेशात साजशृंगार करून सहभागी व्हावे, तसेच कार्यक्रम वेळेत सुरू होणार असून महिलांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 8483926989, 9096853977.

Back to top button