कोल्हापूर : जीव धोक्यात घालून विज कर्मचारी ठरले महापुरातले देवदुत | पुढारी

कोल्हापूर : जीव धोक्यात घालून विज कर्मचारी ठरले महापुरातले देवदुत

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात फ्री कॅचमेंट एरियात पडलेल्या तुफानी पावसाने सर्वच नद्यांना महापूर आला. त्यामुळे विद्युत यंत्रणा कोलमडली. अनेक उपकेंद्रे, रोहित्रे, विद्युत वाहिन्या, विद्युत खांब पाण्याखाली गेले. गावांगावातील पाणीपुरवठा योजनांचे पंपही पाण्यात अडकले. अनेक ठिकाणी विद्युत यंत्रणा बंद पडली. काही ठिकाणी सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा बंद केला. दरम्यान आहोरात्र राबत विज कर्मचारी काम करत होते.

विज कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता विद्युत पुरवठा खंडीत होउ नये यासाठी प्रयत्नशिल होते.

भरपावसात आणि महापुराच्या पाण्यात थंडीने कुडकुडत असतानही या कर्मचार्‍यांनी ग्राहकांच्या घरात प्रकाश पडला पाहिजे या भावनेतून थंडी, वारा, पाऊस याचा विचार न करता सेवा बजावली.

नागाळा, गांधीनगर, थावडे, पाटपन्हाळा, आवाडे मळा, शिरवाड व शिरटी अशी 7 उपकेंद्रे बंद असल्याने 26 गावांत अंधाराचे साम—ाज्य निर्माण झाले.

31 गावांत काही प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला.

अद्याप 52 हजार 273 ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे.

22 वीज वाहिन्या बंद, तर 864 वितरण रोहित्रे बंद आहेत. उच्चदाब वीज वाहिनीचे 112 व लघुदाब वाहिनीचे 192 खांब पडले आहेत.

फुलेवाडीच्या आरे कक्षातील जनमित्र संदीप पाटील, विकास वरुटे व युवराज निकम यांनी नदीपात्र क्रॉसिंगच्या फिडरवरील उच्चदाब वीज वाहिनीची दुरुस्ती पाण्यात जाऊन केली.

जीव धोक्यात घालून काम…

तब्बल साडेपाच तास पाण्यात काम करीत महे गावठाण फिडरवरील 8 गावे व 3900 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला.

कोल्हापूर शहरातील नागाळा व दुधाळी ही दोन उपकेंद्रे पाण्यात गेली होती.

यामुळे शहरातील उत्तर-पश्चिम भागातील वीजपुरवठा खंडित झाला.

सीपीआरसह अनेक रुग्णालये शासकीय कार्यालयांना याचा फटका बसला.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यालयही अंंधारात राहिले.

मात्र शहर विभागातील अभियंते, कर्मचार्‍यांनी शेंडापार्क उपकेंद्रातूनविद्युत भार घेऊन या सर्व भागात विद्युत पुरवठा सुरू केला.

एवढेच नाही, तर यासाठी भूमिगत केबलच्या माध्यमातून वीजभार जोडण्यात आला.

अनेकतांत्रिक व नैसर्गिक समस्यांचा सामना करीत शहराच्या महत्त्वाच्या भागात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम केले.

 

Back to top button