अंकिता कोंवर म्हणते ‘मेडल जिंकलं तर भारतीय, अन्यथा चिंकी-चायनीज-नेपाळी-कोरोना’ | पुढारी

अंकिता कोंवर म्हणते ‘मेडल जिंकलं तर भारतीय, अन्यथा चिंकी-चायनीज-नेपाळी-कोरोना'

पुढारी ऑनलाईन डेस्क : टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानू ४९ वजनी गटात रौप्य पदक विजेती ठरली. यानंतर तिच्यावर भारतातून अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. तिने २१ वर्षानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. तिच्या यशाची चर्चा सगळीकडे सुरु झाली. अनेकांनी तिच कौतुक केल आहे. पण अभिनेता मिलिंद सोमण यांची पत्नी अंकिता कोंवर यांनी वेगळ्या विषयावर आवाज उठवला आहे.

“तुम्ही जर ईशान्य भारतातले असाल आणि जर तुम्ही भारतासाठी पदक जिंकलं तरच तुम्ही भारतीय म्हणून ओळखले जाऊ शकता. नाही तर आपण सगळे ‘चिंकी’, ‘चीनी’, ‘नेपाळी’ किंवा मग ‘करोनाचा कोणता तरी नवीन प्रकार’ म्हणून ओळखले जातो. भारत फक्त जातिवादच नाही तर वर्णभेदानेही ग्रासलेला आहे, अस अंकिता कोंवर यांनी इन्टाग्राम पोस्टमध्ये म्हटल आहे.

अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया

अंकिताने या पोस्टमध्ये ईशान्येतील लोकांशी भेदभाव करणाऱ्यांवर आपला राग व्यक्त केला आहे. अंकिताच्या या पोस्टला अनेकांनी सपोर्ट केला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे.

अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. ‘हे खूपच दुखदायक आणि निराशाजनक आहे. एवढी सांस्कृतिक विविधता असुनही आपल्यात मानवतेची कमी आहे’ अशी प्रतिक्रिया एका वापरकर्त्याने दिली आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने ‘तुम्ही लिहिलेल बरोबर आहे, हे सगळ बदललं पाहीजे’. अस लिहिल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Konwar (@ankita_earthy)

रौप्य पदक विजेत्या मीराबाई चानू साठी डॉमिनोज पिझाची खास ऑफर

टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानू ४९ वजनी गटात रौप्य पदक विजेती ठरली. यानंतर तिच्यावर भारतातून अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. तिने २१ वर्षानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून दिले.

पदक जिंकल्यानंतर तिने एका वृत्तसंस्थेशी बोलताना तिला पिझा खाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर डॉमिनोज पिझा या प्रसिद्ध पिझा फ्रेंचायजीने मीराबाई चानू साठी एक खास घोषणा केली.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

पूरग्रस्तांना बोटींमार्फत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

Back to top button