कोल्हापूर-सांगली रस्त्यावर भीषण अपघातात दोन तरुण ठार | पुढारी

कोल्हापूर-सांगली रस्त्यावर भीषण अपघातात दोन तरुण ठार

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर – सांगली राज्यमार्गावर मालेजवळ आडवा आलेल्या भाजीपाला विक्रेत्याला चुकविण्याच्या प्रयत्नात एका शाळेच्या बसला जोरदार धडक बसून दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दोन तरुण जागीच ठार झाले. सुरज श्रीकांत शिंदे (रा. हारोली ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) व शितल बाबासो पाटील (रा. चंदुर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ) अशी मृत तरूणाची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, शितल पाटील व सुरज शिंदे हे दोघेजण मोटरसायकल ( एमएच ०९ ईसी ११०९ ) वरुन कोल्हापूर- सांगली राज्यमार्गाने कोल्हापूरकडे निघाले होते. ते माले फाटा ओलांडून पुढे निघाले असता अचानक विरोधी दिशेने भाजीपाला घेऊन आलेल्या दुचाकीस्वारास चुकविण्याच्या प्रयत्नात गाडीचा ताबा सुटून समोर असलेल्या एका शाळेच्या बसला धडकून ते दोघे रस्त्यावर जोरात आपटले. यात त्या दोघांना गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.

कोल्हापूर सांगली राज्यमार्गालगत माले फाटा ते हेरले दरम्यान रस्त्यावर भाजी विक्रेत्ते भाजीपाला विक्री करण्यासाठी बसतात आज नेहमीप्रमाणे भाजीपाल्याची विक्री करण्यासाठी विरोध दिशेने येणाऱ्या भाजीवाल्याच्या गाडीस चुकविण्याच्या नादात दोन तरुणांना अपघात होऊन जीव गमवावा लागला . ही माले फाट्यावर बेकायदेशीर पणे निर्माण झालेली मंडई त्वरीत बंद करावी अशी मागणी होत आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ

महिला दिनानिमित्त पुढारीच्या वतीने विशेष मुलाखती

Back to top button