Sunit Rodriguez : माजी लष्कर प्रमुख सुनीत रॉड्रीग्ज यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार | पुढारी

Sunit Rodriguez : माजी लष्कर प्रमुख सुनीत रॉड्रीग्ज यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

पणजी पुढारी वृत्तसेवा : भारताचे माजी लष्कर प्रमुख आणि पंजाबचे माजी राज्यपाल सुनीत रॉड्रीग्ज (Sunit Rodriguez) यांच्यावर पणजी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली.

पणजी येथील मोक्ष स्मशानभूमीत लष्करी बँडच्या सुरात दुपारी तीन वाजता त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी जीन, मुले नील आणि मार्क, मुलगी सूजान व अन्य नातेवाईक उपस्थित होते. सुनीत यांच्या पार्थिवावर प्रथम ख्रिस्ती पद्धतीने प्रार्थना करण्यात आल्या. यानंतर संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या मुलांनी त्यांना अंत्याग्नी दिला.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

महिला दिनानिमित्त पुढारीच्या वतीने विशेष मुलाखती

Back to top button