नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) (russia ukraine war) यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ५० मिनिटे चाललेल्या संभाषणादरम्यान उभय नेत्यांनी युक्रेनमधील बदलत्या परिस्थितीवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधानांना युक्रेन आणि रशियन संघांमधील वाटाघाटीच्या स्थितीची माहिती दिली. दरम्यान, पंतप्रधानांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींचे स्वागत केले तसेच पुतिन लवकरच संघर्ष संपुष्टात आणतील असा विश्वास व्यक्त केला.
पुतिन यांचा युक्रेनचे ( russia ukraine war ) राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यासोबत सुरू असलेला थेट संवाद शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो, असे देखील पंतप्रधानांनी चर्चे दरम्यान सुचवल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे. युद्धभूती 'सुमी'मध्ये अजूनही अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि संरक्षणासंबंधी पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान तीव्र चिंता व्यक्त केली. चर्चे दरम्यान पुतिन यांनी पंतप्रधानांना भारतीय विद्यार्थ्यांसह नागरिकांना सुरिक्षततेसाठी मानवीय कॉरिडोर संबंधी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिल्याचे पीएमओकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांच्याशी देखिल फोनवरुन चर्चा केली. यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोदिमीर झेलेन्स्की (Modi and zelensky) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवादादरम्यान आभार मानले. झेलेन्स्की यांनी ट्विट करून सांगितले की, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाविरोधात होत असलेल्या युद्धात युक्रेनकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरासंदर्भाता माहिती दिली आहे. भारतीय नागरिकांना दिली जाणारी मदत आणि उच्च स्तरावर केली जाणाऱ्या चर्चेतील युक्रेनच्या वचनबद्धतेचं कौतुक केले आहे."
झेलेन्स्की यांनी ट्विट करून म्हटे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाने केलेल्या लष्करी कारवाईविरोधात युक्रेन करत असलेल्या प्रतिकाराची माहिती दिली. युक्रेनने भारतीय विद्यार्थ्याच्या सुटकेसाठी केलेल्या सहकार्याचे भारताने कौतुक केले. युक्रेन सर्वोच्च पातळीवर शांततेत चर्चा करण्यासाठी कटिबद्ध आहे. युक्रेनला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे.