russia ukraine war : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची हत्या झाली तर ? | पुढारी

russia ukraine war : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची हत्या झाली तर ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया आणि युक्रेन मधील युद्ध (russia ukraine war) सुरू आहे. रशिया युक्रेनच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले करत आहे. दरम्यान, अमेरिकेने युक्रेनबाबत मोठे वक्तव्य केले आहे. रशियाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Ukraine President Volodymyr Zelenskyy) यांची हत्या केली तरी सध्याचे सरकार कायम राहील, अशी युक्रेनची योजना आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन (US Secretary of State Antony Blinken) यांनी म्हटले आहे. रशिया आपल्या हेतूंमध्ये कधीही यशस्वी होणार नाही.

परराष्ट्र खात्याशी संबधित ‘फेस द नेशन’ या कार्यक्रमात पत्रकार मार्गारेट ब्रेनन यांना दिलेल्या मुलाखती दरम्यान, ब्लिंकेन म्हणाले, की रशिया युक्रेनवर हल्ला (russia ukraine war) करण्यापुर्वी आधी एक दिवस मी युक्रेनमध्ये होतो आणि परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांची भेट घेतली. याचा अधिक खुलासा न करता, ते म्हणाले, की सरकार चालू यासाठी एक निश्चित योजना आहे.

टीव्ही शोच्या ट्विटर अकाउंटवरून ब्लिंकेनच्या मुलाखतीच्या एका छोट्या व्हिडिओ क्लिपमध्ये, त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि त्यांच्या संपूर्ण सरकारने दाखवलेल्या साहसाचे कौतुक केले. या क्लिपमध्ये त्यांनी युक्रेनियन लोकांचे कौतुक देखिल केले आहे. (russia ukraine war)

याआधी रशिया झेलेन्स्कीला मारण्याची योजना आखत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. वॉशिंग्टन पोस्टच्या म्हणण्यानुसार, रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने युक्रेनियन लोकांना कळवले होते की, चेचेन स्पेशल फोर्सेसची एक विशेष तुकडी झेलेन्स्कीला मारण्यासाठी काडीरोविट्सला पाठवण्यात आली होती. युक्रेनच्या नॅशनल सिक्युरिटी डिफेन्स कौन्सिलचे सेक्रेटरी ओलेस्की डॅनिलोव्ह यांच्या सूत्रांच्या माध्यमातून द टाईम्सने सांगितले की, त्या चेचेन स्पेशल फोर्सेस तुकडीला संपविण्यात आले.

युक्रेनमधील युद्धानंतर अमेरिकेने झेलेन्स्कीला देश सोडण्याची ऑफर दिली, परंतु त्यानी नकार दिला. झेलेन्स्कीने रशियन बॉम्बस्फोटांदरम्यान त्याच्या सुरक्षा दलांसह आणि जवळच्या मित्रांसह राजधानी कीवमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयाचे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक देशांनी कौतुक केले होते.

फ्रान्सच्या अध्यक्षांनी त्यांना आदर, स्वातंत्र्य आणि धैर्याचा चेहरा असे संबोधले आहे. याआधी एका व्हिडिओ संदेशात झेलेन्स्की म्हणाले होते की, जर कोणाला वाटत असेल की युक्रेन नतमस्तक होईल, तर त्याला युक्रेनबद्दल काहीही माहिती नाही आणि युक्रेनशी त्याचा काहीही संबंध नाही.

Back to top button