Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांची करडी नजर | पुढारी

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांची करडी नजर

रत्नागिरी ः पुढारी वृत्तसेवा :  आगामी लोकसभा निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह पोस्ट, आक्षेपार्ह ध्वनीफित व आक्षेपार्ह व्हिडिओ पसरवली तर नागरिकांनी सायबर पोलिस ठाण्याच्या संपर्क क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे. ( Lok Sabha Election 2024 )

संबंधित बातम्या 

फेसबूक, इंस्टाग्राम, एक्स, यु ट्युब व व्हॉटसअ‍ॅपद्वारे कोणीही व्यक्ती निवडणूक 2024 च्या अनुषंगाने या सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करत आहे. अशी खात्री झाल्यास नागरिकांनी रत्नागिरी जिल्हा सायबर पोलिस ठाण्याचा संपर्क क्रमांक 8830404650 या क्रमांकावर आपली तक्रार नोंद करावयची आहे. या तक्रारीची खात्री करुन अफवा तसेच आक्षेपार्ह पोस्ट पसरवणार्‍या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता व लोक प्रतिनिधी कायदा 1951, निवडणूक नियम 1961 च्या तरतूदींनुसार, कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर काही समाजकंटकांनी दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माणा होईल, अशा स्वरुपाच्या पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्या होत्या. तसेच व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस ठेवण्यात आले होते, या प्रकरणी जिल्हयात अनेक ठिकाणच्या पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. ( Lok Sabha Election 2024 )

Back to top button