गुगल ड्राईव्ह युजर्सना हॅकिंगच्या धोक्याचा इशारा | पुढारी

गुगल ड्राईव्ह युजर्सना हॅकिंगच्या धोक्याचा इशारा

वॉशिंग्टन : इंटरनेटवर हॅकिंगचा धोका अनेक वेळा संभवत असतो. त्यामुळे अनेक कंपन्या याबाबत वेळोवेळी सावधगिरीचा इशाराही देत असतात. आता ‘तुम्ही गुगल ड्राईव्ह वापरत असाल, तर तुम्ही हॅकिंगला बळी पडू शकता’, असे सांगण्यात आले आहे. हा अलर्ट विशेषतः गुगल ड्राईव्ह युजर्ससाठी आहे. अशा युजर्सना ‘गुगल’ने सावध राहण्यास सांगितले आहे तसेच संशयास्पद फाईलवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

रिपोर्टनुसार, गुगल ड्राईव्हवर गुगल अकाऊंट युजर्सना एक संशयास्पद फाईल पाठवली जात आहे. अनेक युजर्सनी तक्रार केली आहे की, त्यांना त्यांच्या गुगल खात्यावर फाईल्स रिसिव्ह करण्याची रिक्वेस्ट मिळाली आहे. गुगलने पुष्टी केली आहे की, त्यांना अशा स्पॅम हल्ल्यांबद्दल माहिती आहे. कंपनीचे म्हणणे आहे, की जर तुम्हाला कोणतीही संशयास्पद फाईल आढळली तर ती स्पॅम कॅटेगरीमध्ये मार्क करा. गुगलने सल्ला दिला आहे की, जर तुम्ही संशयास्पद फाईल स्वीकारण्यास मंजुरी दिली असेल, तर त्या लिंकवर क्लिक करू नका. तसेच, अप्रूव्ह झालेले कोणतेही कागदपत्र उघडू नका. युजर्स प्राप्त झालेल्या कोणत्याही संशयास्पद फाईलची तक्रार करू शकतात. यासाठी तुम्हाला स्मार्टफोनवर दिलेल्या तीन डॉटस्वर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला रिपोर्ट ऑप्शनवर टॅप करावे लागेल. जर कॉम्प्युटरमध्ये फाईल उघडली असेल, तर तुम्हाला फाईलवर राईट क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला ब्लॉक किंवा रिपोर्ट या पर्यायावर टॅप करावे लागेल. गुगल ड्राईव्ह युजर्स 2023 मध्ये लाँच तसेच संशयास्पद दिसणार्‍या फाईल्स स्पॅम फोल्डरमध्ये हलवू शकतात. जीमेल प्रमाणे, ड्राईव्हमधील स्पॅम फोल्डर संभाव्य धोकादायक फाईल्स स्टोअर करते. अशा फाईल्स एखाद्या खात्याशी संलग्न किंवा लिंक केल्या जाऊ शकतात. युजर्स फक्त त्या फोल्डरमध्ये फाईल्स ड्रॅग आणि ड्रॉप करू शकतात.

Back to top button