Anganewadi Yatra : आंगणेवाडी यात्रेसाठी मुंबई-करमाळी मार्गावर विशेष गाड्या | पुढारी

Anganewadi Yatra : आंगणेवाडी यात्रेसाठी मुंबई-करमाळी मार्गावर विशेष गाड्या

रोहे, पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन आंगणेवाडी यात्रेसाठी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) करमळी मार्गावर विशेष रेल्वे सेवा चालू करणार आहे. अंगणवाडी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.    Anganewadi Yatra

या गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी विशेष गाडी क्रमांक ०१०४३ स्पेशल १ मार्चरोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०. १५ वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचणार आहे. गाडी क्रमांक ०१०४४ विशेष गाडी करमळी येथून ३ मार्चरोजी दुपारी ३. २० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३. ४५ वाजता पोहोचणार आहे. Anganewadi Yatra

या गाडीसाठी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी असे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला २ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅनसह ४ द्वितीय श्रेणी आणि १ जनरेटर कार (२१ डब्बे) जोडण्यात आले आहेत.

या गाडीसाठी सोमवारी (दि.२६) सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह बुकिंग सुरू होणार आहे. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.  प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button