Raj Thackeray On Sharad Pawar : शरद पवारांना आताच रायगड कसा आठवला?: राज ठाकरे | पुढारी

Raj Thackeray On Sharad Pawar : शरद पवारांना आताच रायगड कसा आठवला?: राज ठाकरे

कल्याण; पुढारी वृत्तसेवा: कायमच फुले शाहू आंबेडकरांची आठवण करणाऱ्या शरद पवारांना आताच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण कशी झाली? आणि आज त्यांना रायगड कसा आठवला? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसभा मतदार संघाची चाचपणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांच्यावर टीका केली. Raj Thackeray On Sharad Pawar

यावेळी त्यांनी ईव्हीएमवर बोलताना इतरत्र सर्वच देशात बॅलेट पेपरच्या निवडणुका चालतात. तर मग भारतामध्ये अशा निवडणुका का नाही चालत. सामान्य जनता कोणाला मत देते, हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. मध्यंतरी काही ईव्हीएमवर स्लीप देण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, तेही सगळीकडे लागू पडलेले नाही. त्यामुळे ईव्हीएमचा घोळ आहे. हे मी कायमच बोलत होतो. मी सगळ्या गोष्टी आधी अभ्यास करतो, त्यानंतर बोलतो, असे त्यांनी सांगितले. Raj Thackeray On Sharad Pawar

पक्ष विरुद्ध पक्ष चिन्ह विरुद्ध चिन्ह अशा पद्धतीने राजकारण लढणे, हे महाराष्ट्रातील चांगले चिन्ह नाही. हे सगळे सुधारायचे असेल. तर जनतेने भानावर येणे आवश्यक आहे. या सर्व लोकांना जनतेनेच वटणीवर आणले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, हे ठीक पण त्यासाठी राज्याच्या पातळीवर काय राजकारण खेळले जाते, हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. नवीन लोक राजकारणात येत आहेत. मात्र अशा पद्धतीने राजकारण खेळत असल्याने त्यांना हेच राजकारण खरे असल्याचे वाटते. याआधी कधीही महाराष्ट्रात अशी अस्थिर परिस्थिती मी अनुभवली नाही.

बेरोजगार पाणी प्रश्न या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे राजकारण केले जात आहे. काही गोष्टींना थांबवण्यासाठी त्या त्या राज्यातील स्थानिक राजकीय पक्ष खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे हे पक्ष अधिक मजबूत होणे गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. शाळेतल्या शिक्षकांना निवडणूक आयोगाचे अधिकारी कामाला जुंपतात. या सगळ्यांमध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी करतात काय ? ही यंत्रणा अपुरी आहे असे ते सांगतात. तर मग हे काम कसे करतात, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एखादा आमदार एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यावर जेव्हा गोळीबार करतो. त्यावेळी त्या आमदाराची मानसिक परिस्थिती काय असेल याचा विचार करणे आवश्यक आहे. पोलिसांनी त्यानुसारच चौकशी केली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button