Ratnagiri : सिंगापूरचा ‘एप्रिल एशिया’चा प्रकल्प रत्नागिरीत | पुढारी

Ratnagiri : सिंगापूरचा 'एप्रिल एशिया'चा प्रकल्प रत्नागिरीत

रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा, रत्नागिरी जिल्ह्यात १० हजार कोटींची गुंतवणूक असणारा उद्योग आणण्यासाठी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न सुरु आहेत. टिशू पेपर बनविणारा सिंगापूरमधील एप्रिल एशिया या कंपनीला समुद्रकिनारी किंवा बंदरांच्याजवळ २ हजार एकर जागेची गरज आहे. औद्योगिक विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे.दिला आहे. (Ratnagiri)

जिल्ह्याला १६७ कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला असून मोठी बंदरे सुद्धा आहेत. या अशा किनारपट्टीच्या ठिकाणी एप्रिल एशिया कंपनी १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास पुढे आली आहे. तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रांमध्ये भूखंडनसल्याने या उद्योगाला बंदर किंवा किनारपट्टीलगत जागेची आवश्यकता आहे. एप्रिल एशिया ही कंपनी उच्च दर्जाचे टिशू पेपरचे उत्पादन करते. हा प्रकल्प आल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास हातभार लागणार आहे. दरम्यान, कोका कोला, रेल्वे डबा बनविणारा कारखाना, पेपर मिल आदी उद्योगही प्रस्तावित आहेत. हे उद्योग लवकरात लवकर येवून सुरु व्हावेत, यासाठीही पालकमंत्री उदय सामंत प्रयत्नशील आहेत. कोकणात नव्याने उद्योग उभे करून रोजगार निर्मीती करण्यात येईल असे सामंत म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button