Afghanistan News: अफगाणिस्तानात रुग्णांवर अफूद्वारे उपचार; तालिबान राजवटीनंतर आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा

Afghanistan News
Afghanistan News
Published on
Updated on

काबूल; वृत्तसंस्था: अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट प्रस्थापित झाल्यानंतर आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. देशातील अनेक रुग्णालयांमध्ये औषधांच्या नावावर रुग्णांना अफू दिली जात आहे. अफगाणिस्तानची लोकसंख्या सुमारे चार कोटींच्या आसपास आहे. यापैकी १० टक्के लोकांना ड्रग्जचे व्यसन आहे. (Afghanistan News)

तालिबान सरकारने अफूचे उत्पादन घेण्यावर बंदी होती. मात्र, परिस्थितीत काही सुधारणा झाली नसून अफूचे उत्पादन कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे. एका अहवालानुसार, अफगाणिस्तानच्या ग्रामीण भागातील रुग्णालयांची स्थिती अत्यंत वाईट आहे. सर्दी, घशात खवखवणे, निद्रानाश आणि किरकोळ वेदना यासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी अफूचा वापर केला जात आहे. (Afghanistan News)

अफगाणिस्तानमध्ये अफू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून लोकांना अमली पदार्थांचे मोठे व्यसन जडले आहे. ही स्थिती बदलली नाही तर अफगाणिस्तानात अमली पदार्थांचा वापर एखाद्या साथीच्या रोगासारखा पसरेल आणि मग त्यावर नियंत्रण मिळवणे अशक्य होईल, अशी भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तालिबान सरकारने अफूच्या उत्पादनाला बेकायदेशीर ठरवले आणि त्याच्या उत्पादनास कारणीभूत असलेल्या लोकांना कठोर शिक्षेचेही तरतूद केली; पण त्याचा काही फरक पडला नसल्याचे समोर आले आहे. (Afghanistan News)

अफगाणिस्तानातील २५ रुग्णालयांना टाळे ठोकले आहे. देशातील २९ दशलक्ष लोकांना मदतीची गरज असून, अफगाणिस्तानातील परिस्थिती अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. (Afghanistan News)

Afghanistan News: दुर्गम भागातील स्थिती वाईट

युनोच्या अहवालानुसार, अफगाणिस्तानची लोकसंख्या सुमारे ४ कोटींच्या आसपास असून आणि यापैकी ४० लाख लोकांना ड्रग्जचे व्यसन जडले आहे. उपचारासाठी देशात औषधे अजिबात उपलब्ध नाहीत. त्यामुळे उपचाराच्या नावाखाली अफूशिवाय अन्य अमली पदार्थांचा वापर केला जात आहे. लोक असहाय्य आहेत, त्यांच्याकडे औषधे नाहीत. दुर्गम भागात अमली पदार्थांचा वापर सर्रास वाढला आहे. जुलाब, घशाचा संसर्ग, निद्रानाश यावर औषधांच्या नावाखाली केवळ अफू औषध म्हणून दिले जात आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news